असलदे दिवानसानेवाडी येथे नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

जिल्ह्यातील विविध नामवंत 40 संघाचा सहभाग
प्रथम पारितोषिक 10 हजार रुपये
असलदे दिवानसानेवाडी येथील श्री गणेश मंडळाच्या वतीने नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सरपंच चंद्रकांत डामरे यांच्या हस्ते फीत कापून तर पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 10 हजार, द्वितीय 5 हजार, तृतीय 1 हजार 500 रुपये, चतुर्थ 1 हजार 500 व चषक देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज व उत्कृष्ट सामनावीर यांनाही विविध बक्षिसे देण्यात येणार आहे.
यावेळी माजी सरपंच पंढरी वायंगणकर, सोसायटी संचालक छत्रुघ्न डामरे, उदय परब, रघुनाथ लोके, प्रदीप हरमलकर, प्रशांत परब, तंटामुक्त समिती अध्यक्ष श्रीकृष्ण परब, सुरेश पांचाळ, महेश परब, गोविंद लोके, अनिल चव्हाण, सुनील चव्हाण, विजय जांभळे, बाळा परब, बाप्पा परब, विश्वनाथ पांचाळ, भावेश परब, बाबू जांभळे, अनिरुद्ध परब, बाबल पांचाळ, सुरेश मेस्त्री, गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच मुंबईकर चाकरमानी उपस्थित होते. ग्रामस्थांनी मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. स्पर्धेत जिल्ह्यातील नामांकित संघांचा सहभाग होता. मान्यवरांनी गणेश मंडळाच्या आयोजनाचे कौतुक केले.





