असगणी येथे श्री देव रामेश्वर पावणादेवी मंदिराचा मूर्ती पुनःप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात

असगणी गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर पावणादेवी मंदिराचा मूर्ती पुनःप्रतिष्ठापना व शिखर कलश प्रतिष्ठापना सोहळा भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यास कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून देवदर्शन घेत ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.
मंदिराच्या सभामंडपासाठी वैभव नाईक यांनी दिलेल्या भरघोस निधीबद्दल देवस्थान समितीच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमास देवस्थानचे प्रमुख मिलिंद गावकर, सुरेश पुजारे, शैलेश पुजारे, लवू मेस्त्री, मंगेश चव्हाण, दशरथ घाडी, नरेश तांबे, पंचायत समिती सदस्य बंडू चव्हाण, उपसरपंच देवेंद्र पुजारे, गजानन बाकरे, बंडू कासले, गणपत राऊत, संजय घाडी, कमलेश पुजारे, आदेश दुखडे, यशवंत घाडी, वैभव चव्हाण, सिद्धेश चव्हाण, सुनील पारकर, दिनेश कासले, विलास कासले, विलास राऊत, अर्जुन परब, आशिष कासले, अनिकेत कासले आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!