कणकवली डीपी प्लान ची प्रतिकृती असलेला केक कापून समीर नलावडे यांचा वाढदिवस साजरा!

पालकमंत्री नितेश राणे यांनी समीर नलावडे यांची घरी भेट घेत दिल्या शुभेच्छा

समीर नलावडे मित्र मंडळ व भाजपा कार्यकर्त्यांकडून नलावडे यांचा उत्साहात वाढदिवस साजरा

कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा वाढदिवस आज कणकवलीत भाजपा कार्यकर्ते व समीर नलावडे मित्र मंडळ यांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी श्री नलावडे यांना त्यांच्या घरी भेट घेत शुभेच्छा दिल्या. तर समीर नलावडे संपर्क कार्यालयामध्ये कणकवली नगरपंचायत च्या डीपी प्लान ची प्रतिकृती रेखाटलेला केक कापून समीर नलावडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या मागे अनेक कारणे असल्याचे देखील बोलले जात आहे. ग्रीन झोन च्या ऐवजी शहरात आता येलो झोन वाढलेला दिसत असून त्याचे चित्र या केकवर रेखाटण्यात आले होते. या वाढदिवसाला माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेविका सुप्रिया नलावडे, मेघा गांगण, माजी नगरसेवक बंडू गांगण, नगरसेवक संजय कामतेकर, मेघा सावंत, प्रतीक्षा सावंत, मनस्वी ठाणेकर आर्या राणे, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, राज नलावडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच समीर नलावडे प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!