कुणकावळे येथील श्री दुर्गादेवी मंदिराचा १६ वा कलशारोहण वर्धापन दिन सोहळा

मालवण तालुक्यातील कुणकावळे येथील श्री दुर्गादेवी मंदिराचा १६ वा कलशारोहण वर्धापन दिन सोहळा दि. १८ व १९ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त मंदिर परिसरात भक्तांसाठी दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, दि. १८ मे रोजी सायंकाळी ६ वाजता पारंपरिक पद्धतीने देवीपूजन होणार असून, सायंकाळी ७ वाजता दुर्गासप्तशती पाठाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३.३० वाजता महिलांसाठी “होम मिनिस्टर” कार्यक्रम होणार आहे. रात्री ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न होणार आहे.
मंगळवार, दि. १९ मे रोजी सकाळी ६ वाजता पूजा, ६.३० वाजता दुर्गाविषयक कार्यक्रम, तर सकाळी ७ वाजता सामुदायिक दुर्गाभिषेक होणार आहे. सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली असून, त्यानंतर महाआरती व महाप्रसाद होणार आहे. दुपारी ३ वाजता संगीत भजनांचा कार्यक्रम रंगणार आहे.
याचबरोबर रात्री साडेनऊ वाजता वसंत कानेटकर लिखित “छू मंतर” हे दोन अंकी धमाल विनोदी नाटक गावातील तरुण हौशी कलाकारांकडून सादर करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!