मोदींच्या आवाहनानंतर राज्य सरकारचा निर्णय ; अधिकारी आता मेट्रो, लोकल आणि बसने करणार प्रवास

इंधन बचत आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःसह मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांच्या वापरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता राज्य सरकारने वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनाही सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान एक दिवस मेट्रो, लोकल किंवा बसने प्रवास करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. इंधन बचत, वाहतूक कोंडी कमी करणे तसेच पर्यावरणपूरक प्रवासाला चालना देणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
तसेच शासकीय बैठका आणि विविध आढावा बैठकींसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा अधिक वापर करण्याच्या सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. यामुळे अनावश्यक प्रवास टाळून वेळ आणि खर्चाची बचत होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





