पोईप येथील श्री देव वेताळ मंदिराचा १६ वा वर्धापन दिन

आज मालवण तालुक्यातील पोईप येथील जागृत देवस्थान श्री देव वेताळ मंदिराचा १६ वा वर्धापन दिन शुक्रवार, दि. १५ मे ला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा होणार आहे. वर्धापन दिनानिमित्त मंदिर परिसरात भक्तांसाठी विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी भाविकांसाठी पूजा-अर्चा, भजन तसेच विविध पारंपरिक कार्यक्रम होणार असून, रात्री साडेनऊ वाजता अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ, मापन यांचा “गजमुख विघ्नेश्वर” हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!