कुणकेश्वर एमटीडीसीत रंगणार ‘आंबा महोत्सव 2026’

पर्यटन विभागातर्फे आंबा महोत्सवाचे आयोजन
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने कुणकेश्वर एमटीडीसी रिसॉर्ट येथे “आंबा महोत्सव 2026” चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 15 मे ते 18 मे दरम्यान दररोज सकाळी 9.30 वाजल्यापासून पर्यटकांसाठी खुला राहणार आहे.
कोकणातील प्रसिद्ध हापूस आंबा, स्थानिक उत्पादने, खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा अनुभव या महोत्सवात पर्यटकांना घेता येणार आहे. आंबा उत्पादकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच कोकण पर्यटनाला चालना देण्याचा उद्देश या महोत्सवामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे पर्यटन व खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री, पर्यटन आणि मृद व जलसंधारण तथा उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.
यावेळी राज्याच्या पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे (भाप्रसे), पर्यटन संचालनालयाचे संचालक मंगेश जोशी (भाप्रसे), उपसचिव संतोष रोकडे तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोकणातील पर्यटन, स्थानिक व्यवसाय आणि आंबा उत्पादकांना या महोत्सवामुळे मोठा फायदा होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





