विधान परिषदेतील नव्या सदस्यांचा शपथविधी सोहळा संपन्न

नव्या आमदारांच्या शपथविधीला मान्यवरांची उपस्थिती
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत निवडून आलेल्या १० नव्या सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी सर्व नव्याने निवडून आलेल्या आमदारांना पुढील लोकसेवेच्या प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री शंभूराज देसाई, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधान परिषद सभापती राम शिंदे, विधान सचिव डॉ. विलास आठवले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.





