जबरी चोरी प्रकरणी दोन आरोपींना मीरा-भाईंदर मधून सापळा रचून अटक

ओटव येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या चैन ची केली होती जबरी चोरी

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची दमदार कारवाई

गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडून अनेक गुन्ह्यांची उकल

सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या गेल्या काही दिवसांच्या गुन्ह्यांच्या उकलीचा आलेख चढता असून, नुकतीच ओटव येथे झालेल्या जबरी चोरी प्रकरणातील आरोपींना मीरा-भाईंदर येथून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने अवघ्या काही दिवसांमध्ये केलेल्या तपास कामामुळे कौतुक केले जात आहे. कणकवली तालुक्यातील ओटव येथे फिर्यादी महिलेच्या गळ्यातील 1 लाख 45 हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या चैनी जबरदस्तीने हिसकावून नेल्याप्रकरणी 22 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने आपल्या गोपनीय माहितीच्या आधारे चोरट्यांचा मग काढण्यास सुरुवात केली. यावेळी साहिल मिलिंद रसाळ (21 रा. वसई ठाणे) मुकेश महेंद्र पाटणे (28 राव. साईनाथनगर विरार) या दोन्ही संशयित आरोपींना मीरा-भाईंदर येथे शिताफीने सापळा रचून 25 एप्रिल रोजी सायंकाळी ताब्यात घेतले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक नायोमी साटम यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसांडेकर, हवालदार ज्ञानेश्वर तवटे, किरण देसाई विल्सन डिसोजा, यांच्या पथकाने ही कारवाई केली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने गेल्या काही महिन्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडकीस आणत त्याचा तपास उल्लेखनीय केला आहे. स्थानिक पुन्हा अन्वेषण विभागाच्या या कामगिरीमुळे अनेक गुन्हे उघडकीस येत आरोपीचे जेरबंद झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या या कामगिरीबद्दल जनतेमधून देखील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे कौतुक केले जात आहे.

error: Content is protected !!