साकेडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये ठाकरे सेनेच्या साक्षी घाडी बिनविरोध

भाजपाच्या उमेदवाराने पोटनिवडणुकीमध्ये घेतली माघार

भाजपाच्या उलट्या गिनतीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरुवात

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची टीका

भाजपाच्या विरोधाची सुरुवात महिला विधेयकाच्या माध्यमातून संसदेतून झाली. व अशाच प्रकारे भाजपाचा विरोध सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील होऊ लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मध्ये ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये साकेडी ग्रामपंचायतच्या सदस्य पदाकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार साक्षी सुनील घाडी या बिनविरोध निवडून आल्या. त्यांच्या विरोधातील भाजपाच्या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपाच्या उलट्या गिनतीची सुरुवात झाल्याचा टोला कणकवली उपनगराध्यक्ष युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लगावला. यावेळी त्यांनी साकेडी ग्रामपंचायतच्या सदस्य पदी बिनविरोध विजयी झालेल्या साक्षी घाडी यांचा सत्कार केला व त्यांना शुभेच्छा दिल्या.
या सत्कार प्रसंगी बोलताना सुशांत नाईक म्हणाले की आतापर्यंत भाजपाच्या उमेदवाराच्या विरोधातील उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे प्रकार होते. मात्र आता आमच्या विरोधातील भाजपा उमेदवाराने आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आमचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. भाजपाच्या विरोधला सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता सुरुवात झाली आहे. असेही श्री. नाईक यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी शिवसेना शाखाप्रमुख संदीप राणे, युवासेना जाणवली विभाग प्रमुख किरण वर्दम सुरज वर्दम, सुनील घाडी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!