श्री देवी भवानीमातेचा त्रैवार्षिक गोंधळोत्सव उत्साहात साजरा होणार

विविध कार्यक्रमांचे करण्यात आले आहे आयोजन
ओरोस (ता. कुडाळ) येथील जाधववाडी परिसरात श्री देवी भवानीमातेचा त्रैवार्षिक गोंधळोत्सव यंदा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने श्री देवी भवानी देवस्थान समितीच्या वतीने सर्व भाविकांना सस्नेह निमंत्रण देण्यात आले आहे.
मंगळवार, 28 एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजता अभिषेक, होम-हवन, प्रार्थना व आरती असे धार्मिक विधी पार पडणार आहेत. सायंकाळी ७ वाजता श्री सावरेश्वर दशावतार नाट्यमंडळ, आवरे (ता. वेंगुर्ले) यांचे “महिमा लक्ष्मी-नारायणाचा” हे पौराणिक दशावतार नाटक सादर होणार आहे.
मंगळवार, दि. २८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत प्रार्थना, आरती व जोगवा मागणे कार्यक्रम होईल. सायंकाळी ७ ते १० या वेळेत महाप्रसाद, मांड भरणे, ओटा भरणे तसेच देवीचा नवस बोलणे व नवस फेडणे असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या उत्सवासाठी श्री. वसंत जाधव, श्री. दशरथ जाधव, श्री. मोहन जाधव, श्री. राजाराम जाधव, श्री. भास्कर जाधव, श्री. देविदास चव्हाण, श्री. मधुकर जाधव, श्री. जयप्रकाश जाधव, श्री. अनिकेत जाधव आदी मान्यवरांचे सहकार्य लाभत आहे. तसेच श्री. सुनील जाधव (अध्यक्ष), श्री. निलेश जाधव (उपाध्यक्ष) व श्री. संजयकुमार ओरोसकर (सचिव) यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीदेवी भवानी देवस्थान समितीच्या व्यवस्थापनाखाली उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम श्री देवी भवानी मंदिर, जाधववाडी-ओरोस येथे होणार असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.





