साकेडीचे सुपुत्र चेतन देवरुखकर यांच्याकडून करंजे येथील गतीमंद विद्यार्थ्यांना जीवनावश्यक साहित्याची मदत

विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य व धान्य दिले मोफत

देवरुखकर कुटुंबियांनी जपली सामाजिक बांधिलकी

कणकवली तालुक्यातील साकेडी गावचे सुपुत्र व सध्या जर्मनी येथे वास्तव्यास असलेले इंजिनीयर चेतन सुनील देवरुखकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत राजर्षी छत्रपती शाहू महाराज मतीमंद निवासी विद्यालय, करंजे (ता. कणकवली) येथील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक साहित्याची मदत केली. परदेशात राहून देखील आपल्या जिल्ह्याशी नाळ जोडून राहिलेल्या या कुटुंबीयांबद्दल प्रशालेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. श्री. देवरुखकर यांनी गतिमंद विद्यालयाला व त्यातील विद्यार्थ्यांना दिलेल्या साहित्यामध्ये तांदूळ ३० किलो, साखर १० किलो, मूगडाळ ५ किलो, बटाटे ५ किलो, तेल ५ लिटर तसेच चहापावडर (ब्रुकबाँड) १ किलो यांचा समावेश आहे. तसेच १० विद्यार्थ्यांसाठी १० वैयक्तिक किट देण्यात आले असून त्यामध्ये कोलगेट टूथपेस्ट १०० ग्रॅम (१ नग), संतूर हँडवॉश २०० मि.ली. (१ नग), पॅराशूट खोबरेल तेल १७५ मि.ली. (१ नग), साबण १०० ग्रॅम (१ नग), टूथब्रश (१ नग), ज्यूस पॅक १५० मि.ली. (१ नग) व बिस्किटे (२ नग) असे साहित्य देण्यात आले. याप्रसंगी इंजिनीयर चेतन देवरुखकर, निकिता देवरुखकर, कियारा देवरुखकर, माजी पंचायत समिती सदस्या अनघा देवरुखकर, सुनील देवरुखकर, प्रशालीच्या शिक्षक सोगम मॅडम व अन्य मान्यवर उपस्थित होते. या सर्वांच्या हस्ते हे साहित्य शाळेला सुपूर्द करण्यात आले. परदेशात राहूनही आपल्या गावाशी नाळ जपणाऱ्या व समाजातील मुख्य प्रवाहापासून काहीशी दूर असलेल्या या गतिमंद विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्यांची दखल घेतल्या बाबत चेतन देवरुखकर यांच्या या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.

error: Content is protected !!