डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकताआणि नावीन्यता विभागामार्फत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांमध्ये सांविधानिक मूल्य, सामाजिक न्याय, समता आणि बंधुता याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती करून सामाजिक न्याय, समता व मानवाधिकार्यांचा दृढ पाया रचला. शिक्षण संघटन आणि समाजसेवा या त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
दोन गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. पहिल्या गटात आयटीआय, डिप्लोमा, बायोफोकल, एमसीवीसी विद्यार्थी तर दुसरा गट महिला आणि पुरुषांच्या साठी खुला गट असेल. पहिल्या गटासाठी 500 ते 800 शब्दांची मर्यादा आहे. तर खुल्या गटासाठी शब्द मर्यादा 800 ते 1200 शब्दांची आहे. या दोन्ही गटांसाठी ”भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य” हा विषय देण्यात आला आहे. दिनांक १४ ते २० एप्रिल २०२६ या कालावधीत निबंध ची हस्तलिखित किंवा टंकलेखित स्वरूपातली प्रत पीडीएफ स्वरूपात अपलोड करायची आहे. दोन्ही गटातील पहिल्या तीन क्रमांकासाठी अनुक्रमे रुपये ३१,०००/- रु. २१,०००/- आणि रु. ११,०००/- रोख, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र अशी पारितोषिके आहेत.
निबंध मराठी भाषेत लिहिणे अनिवार्य आहे. निबंध मूळ स्वरूपात असावा कॉपी आढळल्यास स्पर्धक अपात्र ठरेल. प्रत्येक स्पर्धकांनी एकच निबंध सादर करावा व मजकूर शिष्ट आणि सुसंस्कृत असावा. निबंध हस्तलिखित किंवा टंकलिखित स्वरूपात स्वीकारला जाईल. मात्र अंतिम सादरीकरण पीडीएफ स्वरूपातच करणे आवश्यक आहे. निबंध टाईप करून किंवा हस्तलिखित निबंध स्कॅन करून https://forms.gle/RcFPhcUgY8X4P2NT8 या लिंक वर अपलोड करावा. स्पर्धकांनी आपले पूर्ण नाव, गट क्रमांक, संपर्क क्रमांक, आयटीआय, शाळा, महाविद्यालयाचे नाव व पूर्ण पत्ता याचा उल्लेख करावा. सर्व सहभागी स्पर्धकांना डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेबद्दल अधिक माहितीसाठी 91 522 30 193 या व्हाट्सअप नंबर वर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.





