डिगस ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

अनधिकृत नीस मारून रस्ता अडविल्याचे म्हणणे
न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरुच राहणार
कुडाळ तालुक्यातील गाव मौजे डिगस येथील घाण्याची वाडी, सोनारगाळी ते डिगस हायस्कूल (रस्ता क्र. २३ क्रमांक) वर अनधिकृत नीस मारून रस्ता अडविले बाबत, तसेच पणदूर घोटेगे रस्ता ते सोनाळगाळी देवस्थान कालिका कमिटी यांच्या मार्फत २३ नंबर रस्ता साठी मंजुरी मिळणे या मागणीसाठी डिगस घाण्याचीवाडी येथील नागरिकांनी आपल्या न्याय हक्कासाठी आज गुरुवारपासून ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यानी केला आहे.
उपोषणकर्ते ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना उपोषणाचे पत्र दिले होते. त्यात म्हटले आहे, मौजे डिगस येथील घाण्याची वाडी, सोनारगाळी ते डिगस हायस्कूल या रस्ता क्रमांक २३ वर काही व्यक्तींकडून/कारणास्तव अनधिकृतपणे ‘नीस’ (अडथळा) मारून रस्ता अडविण्यात आला आहे. परिणामी या अडथळ्यामुळे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि वाडीतील ग्रामस्थांना येण्या-जाण्यासाठी प्रचंड त्रास होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा इतर वाहने जाण्यासही मार्ग उरलेला नाही. या संदर्भात यापूर्वीही तोंडी/लेखी कळवूनही अद्याप प्रशासनाकडून सदर अडथळा हटवून रस्ता मोकळा करण्यात आलेला नाही. दि.11/04/2007 साली जमिन मालकाची संमत्ती असूनही आतापर्यंत क्र. 23 रस्ता असून सुदधा व त्यावर मा. खासदार साहेब याचे मंजूरी असून सुदधा ग्रा. पंचायतीने कुठल्याही प्रकारची हालचाल केलेली नाही. आम्ही अर्जदार त्याच गावचे रहिवाशी असून आमची जमिन डिगस चोरगेवाडी धरण प्रकल्पात गेल्यामुळे मानवस्थित असा आम्हाला येण्या-जाण्यासाठी रस्ता नसून अडीअडचणीला कोणत्याही नजिकच्या वडील किवा रस्त्याला संपर्क साधता येत नाही. तरी ग्रामपंचायत वाडी जोडरस्ता योजना रेगाळत आहे. सुमारे 2006 पासून आज पर्यंत मंत्री महोदय व अधिकारी वर्ग याना वेळोवेळी भेटून सुद्धा हे प्रकरण कागदावरच आहे. वेळोवळी आम्ही लेखी स्वरुपात निवेदन पत्रव्यवहार करुन शासनाकडून अदयाप आम्हाला न्याय मिळाला नाही. किवा आमच्या पत्रास उत्तर दिलेले नाही. तसेच रस्ता 23 क्रमांकला लागुन 20 वर्षे पूर्ण झालेली असून त्यावर एकही रुपया खर्च करण्यात आलेला नाही. व रस्त्याची हदद ही निश्चित केलेली नाही. त्याच बरोबर 23 क्र.रस्त्याच्या जागेवर आजुबाजूच्या जमिन मालकांनी नीस मारलेले असून रस्ता पुर्ण पणे बंद झालेला आहे. व त्याची हदद निश्चित करणे कठीण झाले आहे. त्यामुळे चार दिवसात निस काढून रस्ता मोकळा करावा नाहीतर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. त्याप्रमाणे आज पासून ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले.
उपोषणस्थळी स्वप्निल कमलाकर धावले, सौ. स्वप्नाली स्वप्निल कमलाकर धावले, बापू काशीराम धावले, प्रभावती काशीराम धावले, सुरेश महादेव शिरोडकर, मंगेश वामन शिरोडकर, सुजन शिरोडकर, रामकृष्ण शिरोडकर, अनंत गोसावी, प्रकाश गोसावी, पांडुरंग शिंदे, जयवंती शिंदे, पुरुषोत्तम कुबल हे ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयात समोर उपोषणास बसले आहेत. तर या उपोषणास अपंग व्यक्तींनी देखील पाठिंबा देण्यासाठी आपली उपस्थिती दर्शवली. गावातील लोकांनी सुद्धा उपोषणस्थळी येऊन उपोषणकर्त्यांना आपला पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी यावर ठोस मार्ग काढतील असा विश्वास उपोषणकर्त्यानी व्यक्त केला आहे.





