तेंडोलीत १९ पासून श्री देव रवळनाथ पंचायतनचा वर्धापन सोहळा

तेंडोलीचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ पंचायतनचा वर्धापन सोहळा १९ ते २५ एप्रिल या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. १९ रोजी सकाळी ७ वाजता देवतावंदन, पुण्याहवाचन, अग्नीस्थापन, ग्रहयज्ञ, ऋग्वेद शाकल संहिता स्वाहाकारारंभ, ७.३० वाजता श्री देव रवळनाथ चरणी दररोज ऋग्वेदसंहिता अभिषेक पूजा, यज्ञमंडप वास्तुयजन, गणपती लघुरुद्र, दुपारी १ वाजता नैवेद्य, प्रसाद, सायंकाळी ५ वाजता किर्तनकार – स्नेहलदीप सामंत यांचे कीर्तन, रात्री ८ वाजता १४ वर्षाखालील वयोगट रेकॉर्ड डान्स,
दि. २० रोजी सकाळी ७ वाजता स्थापित देवता पूजन, ७.३० वाजता स्वाहाकार, श्री जगदंबा सातेरी लघुरुद्र, ५ वाजता अॅड. दिलीप ठाकूर (मालवण) यांचे गायन, ७ वाजता नित्य आरती, रात्री ९ वाजता तेंडोलकर दशावतार मंडळ (झाराप) यांचे नाटक. दि. २१ रोजी सकाळी ७ वाजता स्थापित देवता पूजन, ७.३० वाजता स्वाहाकार, महादेव लघुरुद्र, दुपारी १ वाजता नैवेद्य, प्रसाद, सायंकाळी ४ वाजता तरंगस्वरूप देव नेसवणे-पाषाणे सजवणे, तरंगाना वस्त्रालंकार, रात्री ८ वाजता श्री देव रवळनाथ मंडळा अंतर्गत ‘श्रींची इच्छा’ कलामंच (तेंडोली) यांचे ‘लावणी भुलली अभंगाला’ संगीत नाटक.
दि. २२ रोजी सकाळी ७ वाजता स्थापित देवता पूजन, ७.३० वाजता स्वाहाकार, शिखर कलश विधी, जलाधिवास, शयन, हवन, श्री जगदंबा भद्रकाली लघुरूद्र, दुपारी १ वाजता नैवेद्य, प्रसाद, सायंकाळी ५ वाजता किर्तनकार-मकरंद देसाई (तेंडोली) चे कीर्तन, रात्री ८ वाजता पालखी प्रदक्षिणा, ९ वाजता श्री रवळनाथ द. ना. मंडळ (तेंडोली) यांचे नाटक. दि. २३ रोजी सकाळी ७ वाजता स्थापित देवता पूजन, ७.३० वाजता स्वाहाकार श्री वेताळ लघुरुद्र, ९ वाजता सातेरी मंदिर मांडावर देव तरंग, पालखीसह आगमन होऊन देव संचारासहित कलशारोहण, ९.३० वाजता शिखर कलश प्रतिष्ठा सोहळा श्री लक्ष्मी नरसिंहपीठ, श्री शंकर मङ, गोकर्ण क्षेत्र कुमठा येथील श्रीमद् शंकराचार्य, ब्रहमानंद सरस्वती महाराज यांच्या पवित्र सानिध्यात त्यांच्या शुभहस्ते होणार आहे. दुपारी १ वाजता नैवेद्य, प्रसाद, सायंकाळी ५ वाजता किर्तनकार-राजू मुंडले यांचे किर्तन, रात्री ८ वाजता पालखी प्रदक्षिणा, ९ वाजता शिवप्रेमी मित्रमंडळ (तेंडोली) यांची एकांकिका,
कलांकुर ग्रुप (तेंडोली) यांची एकांकिका, कलांकुर ग्रुप आंबेडकर नगर (तेंडोली) यांची एकांकिका.
दि. २४ रोजी सकाळी ७ वाजता स्थापित देवता पूजन, ७.३० वाजता स्वाहाकार श्री देव रवळनाथ ऋग्वेद संहिता अभिषेक सांगता महापूजा, ११ वाजता बलीदान, पूर्णाहूती, अवभृत स्नान, दुपारी १ वाजता नैवेद्य, आरती, आशिर्वाद, महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता वावळेश्वर दशावतार मंडळ (तेंडोली) चे नाटक, रात्री ८ वाजता पालखी प्रदक्षिणा, रात्री १० वाजता १४ वर्षावरील रेकॉर्ड डान्स. दि. २५ रोजी स्वारिंचे सातेरी मंदिरात मांडावर आगमन संचार होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव रवळनाथ पंचायतन देवसस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती (तेंडोली) आणि सर्व पंचायतनप्रेमी भक्तजन मानकरी, सेवेकरी, बारापाच यांनी केले आहे.

error: Content is protected !!