ओटीपी अभावी सिंधुदुर्गातील LPG गॅस ग्राहक इंधनापासून वंचित

ओटीपीला नेटवर्कचा अडसर
सुधारणा न झाल्यास युवासेना जाब विचारणार
ओटीपी अभावी सिंधुदुर्गातील LPG गॅस ग्राहक इंधनापासून वंचित राहत आहे. खेडोपाडीओटीपी मिळण्यासाठी नेटवर्कचा अडसर होत आहे. यात सुधारणा न झाल्यास युवासेना जाब विचारेल असा इशारा युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगर कपाऱ्याचा व वनांनी वेढलेला आहे. सध्या परिस्थिती एलपीजीचा तुटवडा असल्याने घरगुती इंधनासाठी लागणारा LPG गॅस मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत लोकांना गॅस बुकिंग करताना बऱ्याच अडचणी येत आहेत. सिंधुदुर्गातील बऱ्याच खेडेगावांमध्ये व गावांमध्ये मोबाईलचे दूरसंचारची सेवा पुरवणाऱ्या सर्व कंपन्यांची नेटवर्क सुविधा सर्वत्र मिळत नाही . त्याचप्रमाणे बरेच टॉवर्स मेन्टेनन्स न केल्याने बंद स्थितीत पडलेले आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेडेगावातील बरेच ग्राहक हे इतर कंपनींच्या तुलनेत आर्थिक दृष्ट्या परवडणारे असल्याने हे बीएसएनएल कंपनीचे सिम कार्ड वापर करते आहेत. माणगाव सारख्या खोऱ्यात असे निदर्शनास आले आहे की काही टॉवर्सच्या बॅटऱ्या चोरीस गेल्या आहेत परिणामी टॉवर बंद स्थितीत आहे. या सगळ्या तांत्रिक अडचणीच्या परिस्थितीत गॅस एजन्सींकडून येणारे डिलिव्हरी बॉय बुकिंगची व ओटीपी ची अपेक्षा करतात आहेत ओटीपी नाही तर सिलेंडर देणार नाही काही लोकांना बुकिंग असून देखील ओटीपी चे मेसेज मिळत नाहीत. केवायसी नाही तर बुकिंग होणार नाही. बुकिंग नाही तर सिलेंडर नाही. काही ग्राहकांच्या मोबाईलचा मेसेज बॉक्स फुल असल्याने ओटीपी मिळत नाहीत . काही ग्राहकांकडे मेसेज चे रिचार्ज नसल्यामुळे ओटीपी मिळत नाहीत . खेडेगावातील बरेच लोक हे स्मार्टफोन ऐवजी अजूनही कीपॅड असलेल्या मोबाईलचा वापर करत आहेत .काही गॅस ग्राहकांची परिवारातील सदस्य हे कामानिमित्त बाहेरगावी असतात आई वडील वयस्कर असल्याने ते बुकिंग करू शकत नाहीत अशावेळी ओटीपी मिळवणे कठीण झाले आहे. त्यात डिलिव्हरी बॉयच्याच मोबाईल ला पण रेंज नसल्यामुळे कंपनीकडून दिलेल्या ॲपचा उपयोग काही होत नाही . पुणे मुंबई सारख्या मेट्रो सिटी अशा प्रकारचा ओटीपीचा घाट घालणे ठीक आहे . परंतु आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशाप्रकारे ओटीपी चा आग्रह धरणे हे चुकीचे आहे .जून महिन्यात पावसाळा चालू झाला की मोबाईलचे नेटवर्क मिळणे फारच कठीण आहे. या सर्व परिस्थितीत बुकिंग व ओटीपी अभावी ग्राहकांना गॅस सिलेंडर द्यायचा की नाही हे जिल्हाप्रशासनाने ठरवावे . व त्यावर पर्यायी व्यवस्था करावी इराण अमेरिका व इजराइल यांच्या युद्धापेक्षा गॅस सिलेंडर चा ओटीपी मिळवण्यासाठी ग्राहक व गॅस एजन्सी मध्ये चाललेल्या शीतयुद्धाचा देखील. विचार करावा. अन्यथा येत्या काळात युवा सेना विचारल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.





