आचरा ग्रामपंचायतीचा असाही आदर्श

आचरा ग्रामपंचायत , सरपंच उपसरपंच,सर्व सदस्य व कर्मचारी यांचा मासिक सभेत शंभर टक्के करभरणा,
आचरा ग्रामपंचायत ची मासिक सभा सरपंच जेरोन फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली इनामदार श्री देव रामेश्वर सभागृहात संपन्न झाली.या सभेत सरपंच जेरोन बस्त्याव फर्नांडिस यांनी स्वतः करभरणा करत उपस्थित सर्वांना आवाहन केल्या प्रमाणे उपसरपंच संतोष मिराशी व सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी त्यांची स्वतःची सन 2026 /27 या आर्थिक वर्षाची करवसुली घरपट्टी/पाणीपट्टी शंभर टक्के भरणा करून एक वेगळा आदर्श घालून दिला. तसेच यावेळी सर्व ग्रामस्थांनी, कर धारकानी आपली करवसुली शंभर टक्के भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. या सभेस सरपंच उपसरपंच यांच्या सह ग्रामविकास अधिकारी पद्माकर कासले, सदस्य मुजफ्फर मुजावर
पंकज आचरेकर, महेंद्र घाडी, चंद्रकांत कदम ,योगेश गावकर सायली सारंग ,अनुष्का गावकर, पूर्वा तारी, हर्षदा पुजारे, श्रुती सावंत ,वरिष्ठ लिपिक नरेश परब यांसह सर्व कर्मचारी आदी उपस्थित होते.





