कोकण नाऊ सावंतवाडी पर्यटन महोत्सवाची सिने कलाकारांच्या उपस्थितीमुळे रंगत वाढणार : “स्वराज्य रक्षक संभाजी” मालिकेतील हंबीरराव मोहिते,मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अनिल गवस देणार महोत्सवाला भेट.

25 एप्रिल रोजी होणाऱ्या “कोकण नाऊ क्वीन” या भव्य फॅशन शो निमित्त अभिनेते अनिल गवस यांची प्रमुख उपस्थिती.

सावंतवाडी:प्रतिनिधी सावंतवाडी येथील जिमखाना मैदान येथे कोकण नाऊ चॅनेल आयोजित “कोकण नाऊ सावंतवाडी पर्यटन महोत्सव 2026” हा येत्या 17 एप्रिल पासून संपन्न होणार असून तब्बल दहा दिवस म्हणजेच 26 एप्रिल पर्यंत हा महोत्सव आयोजित केला आहे.यां महोत्सवा निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये दिनांक 25 एप्रिल रोजी कोकण नाऊ क्वीन हा भव्य फॅशन शो आयोजित केला असून यां फॅशन शो निमित्त मराठी आणि हिंदी सिने सृष्टीतील दिग्गज कलाकार अभिनेते अनिल गवस हे उपस्थित राहणार आहेत.
सिंधुदर्गातील वाफोली हे मुळ गाव असलेले अनिल गवस यांनी मच्छिन्द्र कांबळीं यांच्या बरोबर मालवणी वस्त्रहरण’ नाटकाचे एक हजारहून अधिक प्रयोग केले आहेत.त्यांनी आतापर्यत १०० हुन अधिक दृरदर्शन मालिका,नाटके,मराठी-हिंदी चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत.झी मराठीवरीलश्रीयुत गंगाधर टिपरे’,’भाग्यविधाता’, ‘कळत-नकळत’ , ‘या सुखांनो या’, ‘सावित्री’ , ‘तिसरा डोळा”‘, ‘भाग्यलक्ष्मी’ , ‘दामिनी’, वहिनीसाहेब” . ‘ असंभव, ‘समांतर’ , ‘राधा ही बावरी’ या मालिकांमधील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. बाईमाणुस’ , ‘लोणावळा बायपास’ , ‘कॅरी ऑन पांडू ‘, ‘टिंग्या, ‘साने गरुजी”‘, ‘कोल्ह्याट्याच पोर’, ‘आनंदी’, ‘चिरंजीव’, ‘हाक’, ‘मूंबई टाइम्स’, ‘लपाछपी’ ‘अगडबंब २’ या मराठी चित्रपटात तर ‘वस्त्रहरण’, ‘वडाची साल पिंपळाक’ . ‘ भैय्या हातपाय पसरी’ या मालवणी नाटकात भूमिका साकारल्या आहेत. ‘अर बापरे’, ‘शंभू राजे, “‘प्रेम पुजारी’, ‘पाहिजे जातीचे’, तुम्ही-आम्ही’ या नाटकांचे त्यांनी नाट्य दिग्दर्शनही केले आहे.अनिल गवस यांनी त्यांनी निर्मित केलेल्या शंभू राजे या नाटकातून डॉ. अमोल कोल्हे यांना त्यांनी संधी दिली होती.त्यानंतर महाराष्ट्राला सर्वगुणसंपन्न अभिनेता मिळाला.या नाटकाने महाराष्ट्रात तुफान लोकप्रियता मिळविली. त्यांची स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील ‘हंबीरराव मोहिते’ ही भूमिका फार गाजली. मालिकेतील “हंबीरराव” या त्यांच्या भूमिकेला रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
अश्या या दिग्गज अभिनेत्यांच्या उपस्थितीमुळे कोकण नाऊ सावंतवाडी पर्यटन महोत्सवाची रंगत अधिकच वाढणार आहे.

error: Content is protected !!