“सुख म्हणजे नक्की काय असत” मालिका फेम”रंगारंग शेखर दाजी”येणार सावंतवाडीकरांच्या भेटीला.

दिग्गज अभिनेते गणेश रेवडेकर यांची “कोकण नाऊ सावंतवाडी पर्यटन महोत्सवाला”रविवार दिनांक 19 एप्रिल रोजी विशेष उपस्थिती.

प्रसिद्ध सिनेकलाकारांच्या उपस्थितीत रंगणार “खेळ पैठणीचा” कार्यक्रम.

सावंतवाडी:प्रतिनिधी कोकण नाऊ चॅनेल आयोजित ‘कोकण नाऊ सावंतवाडी पर्यटन महोत्सव 2026′ हा येत्या 17 एप्रिल ते 26 एप्रिल 2026 या कालावधीत सावंतवाडी येथील जिमखाना मैदान येथे येथे संपन्न होत आहे.भव्य फन फेअर,फूड फेस्टिवलं, ऑटो एक्स्पो,कंझुमर स्टॉल आणि सांस्कृतीक कार्यक्रम हे महोत्सवाचे खास आकर्षण आहे.दहा दिवस दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांच आयोजन या महोत्सवादरम्यान करण्यात आल आहे.या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी अर्थात 19 एप्रिल 2026 रोजी ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमावेळी मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील दिग्गज अभिनेते गणेश रेवडेकर उपस्थित राहणार आहेत.
अभिनेते गणेश रेवडेकर यांनी आपला अभिनय प्रवास दादर येथील प्रसिद्ध छबिलदास शाळेतून सुरू केला.त्यानंतर महर्षी दयानंद महाविद्यालय आणि व्यावसायिक मराठी नाटकांच्या माध्यमातून त्यांचा हा प्रवास आजही अविरत सुरू आहे.मराठी व्यावसायिक नाटकांच्या माध्यमातून त्यांनी आजवर संपूर्ण महाराष्ट्रात ५००० हून अधिक नाट्य प्रयोग सादर करण्याचा विक्रम केला आहे.त्यांनी सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे आणि संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गाजलेल्या नाटकांत भूमिका केल्या आहेत.यामध्ये ‘सुयोग्य असा मी अशी मी’,’श्रीमंत दामोदर पंत’,’जाऊ बाई जोरात’,’सही रे सही’,’ती ती आणि ती’,’दिवसा तू रात्री मी’,’गावात होईल शोभा’ आणि ‘शुभ दंगल सावधान’ यांसारख्या सुपरहिट नाटकांचा समावेश आहे. त्यांनी आतापर्यंत २५ हून अधिक मराठी चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.’जत्रा’, ‘नटरंग’,’झकास’, ‘गोलमाल’,’बकुळा नामदेव घोटाळे’,’लालबाग परळ’ आणि ‘वरण भात लोणचं’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.
जुडवा २’ आणि ‘गोविंदा नाम मेरा’ या हिंदी चित्रपटांतही त्यांनी काम केले आहे.तसेच झी टीव्ही,ई टीव्ही मराठी आणि स्टार प्रवाह वरील ‘हसा चकट फू’, ‘फू बाई फू’,’आपण यांना हसलात का’,’ढिंका चिका’ या विनोदी मालिकांतून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

शेखर दाजी म्हणून विशेष ओळख: सध्या ‘स्टार प्रवाह’ वरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या लोकप्रिय दैनंदिन मालिकेत ते ‘शेखर दाजी’ ही महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारली असून,या एकाच भूमिकेसाठी त्यांनी तब्बल २००० पेक्षा जास्त भागांमध्ये सहभाग नोंदवला आहे.
जिमखाना मैदान सावंतवाडी येथे 17 एप्रिल ते 26 एप्रिल 2026 रोजी संपन्न होणाऱ्या “कोकण नाऊ सावंतवाडी पर्यटन महोत्सवात” केवळ फिरण्यासाठीच नाही,तर खरेदी आणि खाद्य प्रेमिंसाठी साठी खास व्यवस्था करण्यात आली आहे.
✅फूड फेस्टिवल: खवय्यांसाठी चविष्ट पदार्थांची रेलचेल.
✅फन फेअर: मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी विविध पाळणे व खेळ.
✅प्रदर्शन: ऑटोमोबाईल, प्रॉपर्टी, फर्निचर, इंटिरिअर, सोलर, लाईफ स्टाईल आणि हँडलूम हँडीक्राफ्टचे स्टॉल्स.

तसेच भव्यदिव्य असे सांस्कृतिक कार्यक्रम देखील या महोत्सवादरम्यान आयोजित करण्यात आले आहेत यामध्ये
✅17 एप्रिल 2026 – वेशभूषा स्पर्धा
✅18 एप्रिल 2026 -डबलबारी भजन
✅19 एप्रिल 2026-खेळ पैठणी
✅20 एप्रिल 2026 – हिंदी मराठी गाण्यांची मैफिल, प्रदर्शनीय कराओके संगीत रजनी
✅21 एप्रिल 2026-लावणी स्पर्धा,फुगडी जुगलबंदी
✅22 एप्रिल 2026-खेळ पैठणी
✅23 एप्रिल 2026 – दशावतारी नाटक
✅24 एप्रिल 2026 – एकेरी नृत्य स्पर्धा
✅25 एप्रिल 2026- भव्य फॅशन शो
✅26 एप्रिल 2026 – डान्स शो
या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सावंतवाडीकरांनी या महोत्सवाचा आनंद लुटावा असे आवाहन कोकण नाऊ चॅनलच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!