खारेपाटण हायस्कूल मधील प्राथमिक विभागाचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय व्यक्तिमत्व श्री. विजय तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या समारंभामध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शैक्षणिक तसेच विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचे कौतुक करण्यात आले. “आजची पिढी नोकरीकडे अधिक वळत आहे, मात्र विद्यार्थ्यांनी उद्योजकतेकडेही लक्ष देऊन नवीन दिशा स्वीकारावी.”असे आवाहन श्री तावडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. “शाळेला कोणतीही गरज भासल्यास मला जरूर कळवा, माझ्या आईच्या स्मरणार्थ शाळेसाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा आहे,” असेही त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
यावेळी शाळेतील गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. भारताच्या यादीत क्रमांक मिळवणाऱ्या आलेशा इसफ आणि समर्थ ठाकूर यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. याशिवाय एकूण ३२ विद्यार्थ्यांना ब्राँझ व सिल्वर मेडल प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रवीणजी लोकरे, उपाध्यक्ष श्री रघुनाथ राणे, सचिव श्री. महेश कोल्सुलकर, संचालक श्री. विजय देसाई , श्री. कांबळे सर, श्री. राजेंद्र वरुणकर तसेच प्रशालेचे प्राचार्य श्री. संजय सानप, आणि पर्यवेक्षक श्री राऊत सर आणि पालकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होते.






