कणकवलीत सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन

नाव नोंदणी करण्याचे करण्यात आले आहे आवाहन

कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण समाज सेवा मंडळ, तालुका कणकवली यांच्या वतीने तालुक्यातील कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण समाजातील बांधवांसाठी सामुदायिक उपनयन संस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, दिनांक ०७ मे २०२६ रोजी फोंडाघाट येथील संस्थेच्या “पूर्णानंद भवन” येथे पार पडणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील इच्छुक मुलांचे उपनयन एकत्रितपणे पार पाडले जाणार असून, पालकांनी आपल्या मुलांची नावे नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी तसेच नोंदणीसाठी दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नोंदणीची अंतिम तारीख सोमवार, दिनांक २० एप्रिल २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे समाजातील धार्मिक परंपरा जपण्यास तसेच सामाजिक एकात्मता वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे. नावनोंदणी संपर्कासाठी :
हर्षल उर्फ राजू सुधाकर गावणकर 9422584900 (कणकवली)
रामचंद्र रघुनाथ बावकर 9421322715 (कणकवली)
अरुण वसंत सामंत 9423300002 (फोंडाघाट) यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी व समाजबांधवांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!