कणकवलीत श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त ‘अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे’ आयोजन

कणकवली:प्रतिनिधी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ,त्र्यंबकेश्वर आणि श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग,दिंडोरी प्रणित कणकवली केंद्राच्या वतीने श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त भव्य ‘अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आले आहे.गुरुवार ९ एप्रिल ते बुधवार १५ एप्रिल २०२६ या कालावधीत हा आध्यात्मिक सोहळा संपन्न होणार आहे.विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल या सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आली आहे.सप्ताहाच्या काळात दररोज पहाटे ५ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत.
दैनंदिन कार्यक्रम: सामुदायिक श्री गुरुचरित्र वाचन,भूपाळी आरती,नैवेद्य आरती,श्री दुर्गा सप्तशती व श्री स्वामी चरित्र पठण,औदुंबर प्रदक्षिणा आणि सायंकाळी आरती.

विशेष मार्गदर्शन: दररोज सायंकाळी ७ वाजता विविध समस्यांवर मार्गदर्शन व प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम होईल.

सप्ताहाचे मुख्य आकर्षण: विशेष याग
प्रत्येक दिवशी विशिष्ट देवतांच्या आशीर्वादासाठी विशेष याग आयोजित करण्यात आले आहेत:

९ एप्रिल: सप्ताह प्रारंभ व यज्ञभूमी अग्निस्थापना.
१० एप्रिल: श्री गणेशयाग व मनोबोध याग.
११ एप्रिल: चंडीयाग.
१२ एप्रिल: स्वामीयाग.
१३ एप्रिल: गीताई याग.
१४ एप्रिल: रुद्रयाग व मल्हारी याग.
१५ एप्रिल: नित्यस्वाहाकार, सत्यदत्त पूजन,बली पूर्णाहुती आणि सांगता समारोह सकाळी 10:30 वाजता

तसेच महाप्रसादाचे आयोजन
बुधवार १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता महानैवेद्य आरती झाल्यानंतर दुपारी १२:०० ते २:०० या वेळेत भव्य ‘महाप्रसादाचे’ आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम श्री. नरेंद्र (दादा) पाटकर यांच्या जागेत,कनक पॅराडाईज समोर,जुना नरडवे रस्ता, कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे.
या मंगलमयी सोहळ्यात सर्व स्वामी भक्तांनी आपला अनमोल वेळ देऊन सेवेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!