खारेपाटण हसोळटेंब कोंडवाडी येथील रस्त्यासाठी ५० लाख निधी मंजूर

ग्रामस्थांनी मानले पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार

जिल्हा नियोजन वार्षिक योजना सन २०२५ – २६ या आर्थिक वर्षातून कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील हसोळटेंब कोंडवाडी रस्त्यासाठी माननीय पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून व खारेपाटण माजी सरपंच व भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री रामकांत राऊत यांच्या मागणी व प्रयत्नातून खारेपाटण येथील हसोळटेंब कोंडवाडी रस्त्याच्या दुरुस्तीकरण मजबुतीकरीता खडीकरण व डांबरीकरण काम करणेसाठी सुमारे ५० लाख एवढा निधी मंजूर झाला असून लवकरच या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती श्री रामकांत राऊत यांनी दिली.
खारेपाटण हसोळटेंब कोंडवाडी येथील रस्त्याच्या मागणीसाठी स्थानिक नागरिकांची गेली बऱ्याच वर्षांपासूनची असलेली मागणी अखेर यानिमित्ताने पूर्ण झाली असून याकरिता माजी सरपंच श्री रमाकांत राऊत यांनी सातत्याने पालकमंत्री नामदार नितेश राणे यांचेकडे पाठपुरावा करून सदर रस्त्यासाठी निधी मंजूर करून घेतल्यादल खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे स्थानिक ग्रामस्थानी आभार व्यक्त केले आहेत.

error: Content is protected !!