साळीस्ते कांजीरवाडी रस्ता व साळीस्ते बौद्धवाडी हायवे ते बुरंबावडे रस्ता खडीकरण, डांबरीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर व माजी जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार यांच्या प्रयत्नातुन साळीस्ते कांजीरवाडी रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे व साळीस्ते बौद्धवाडी हायवे ते बुरंबावडे रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ही कामे मंजूर झाली असून या कामाचे भूमिपूजन माजी सभापती बाळा जठार यांच्या हस्ते करण्यात आले करण्यात आले यावेळी पंचायत समिती सदस्य -राजेश जाधव यांच्यासह साळीस्ते गावचे सरपंच प्रभाकर ताम्हणकर, उपसरपंच – जितेंद्र गुरव, सदस्य- मंगेश कांबळे, गिरीश कांबळे, तंटामुक्त अध्यक्ष – सुरेश साळीस्तेकर, ग्रामसेवक – विशाल वरवडेकर, प्रेमानंद कुळकर्णी,दिवाकर कुलकर्णी, बूथ अध्यक्ष -चंद्रकांत हर्याण, मयुरेश लिंगायत, हिम्मत कांबळे, हरी कांबळे, विजय कांबळे, प्रकाश कांबळे, चंद्रकांत राबांडे, महेश गुरव, ठेकेदार – मयूर चव्हाण,भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!