कलमठ येथे शीत शवपेटीचे लोकार्पण

ग्रामपंचायतच्या माध्यमातून कलमठ गावाला नवीन शीत शवपेटी सेवा
ग्रामस्थांच्या उपस्थितीत लोकार्पण
कलमठ ग्रामपंचायतच्या पंधराव्या वित्त आयोग मधून कलमठ गावासाठी नवीन शीत शवपेटी उपलब्ध करून देण्यात आली. अनेक दिवसांची कलमठ गावाची मागणी पूर्ण झाली आहे. ग्रामपंचायत माध्यमातून विविध सेवा उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न असताना आज अजून एका नव्या सेवेची भर पडली असल्याचे सरपंच संदीप मेस्त्री म्हणाले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया मेस्त्री, पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर, उपसरपंच दिनेश गोठणकर, महेश लाड,स्वप्निल चिंदरकर, अनुप वारंग,नितीन पवार, प्रीती मेस्त्री, नजराना शेख, श्रेयस चिंदरकर,नाना कांबळी,आबा ढवण,सुरेश कोरगावकर,तनोज कळसुलकर, सुरेश ढवण, राजू कोरगावकर,शरद कुडतरकर, बाळा आचरेकर, हेलन कांबळे, बाबू नारकर, दिगंबर मर्तल, सुनील रेपाळ, स्वरूप कोरगावकर, जयराम चिंदरकर, आबा कोरगावकर,बाबू पाष्टे, पपू कोरगावकर, नंदू कोरगावकर,बाबू पाष्टे, परेश कांबळी,नाना गोठणकर,अशोक कदम, संजय बेलवलकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





