कांबळी गल्लीत २ एप्रिलला हनुमान जन्मोत्सव

विविध कार्यक्रमांचे आयोजन
शहरातील कांबळीगल्ली येथील बाळा गोपाळ हनुमान मंदिर व धर्मराज महाराज समाधीस्थळ येथे गुरुवार, २ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ६.४५ वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळ्याने कार्यक्रमांची सुरुवात होईल. सकाळी ८ वाजता श्रींची पूजा, अभिषेक व तीर्थप्रसाद, तर सकाळी ९.३० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा होणार आहे. दुपारी १२ वाजता श्रींची महाआरती व तीर्थप्रसाद, तर दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
संध्याकाळी व रात्री धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल असणार आहे. रात्री महाआरती व दीपोत्सवानंतर रात्री ८.३० वाजता बाळगोपाळ हनुमान मित्रमंडळ प्रस्तुत ‘जल्लोष २०२६’ या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा होईल. त्यानंतर रात्री ९ वाजता नृत्य व गाण्यांचा कलाविष्कार सादर करण्यात येणार असून, भारतीय पारंपरिक वेशभूषेतील महिलांचा फॅशन शो हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.
या उत्सवात भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बाळा गोपाळ हनुमान मंदिर व धर्मराज महाराज समाधीस्थळ समितीच्या वतीने करण्यात आले आहे.





