वरवडे येथे कोष्टीवाडी मित्रमंडळाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कोष्टीवाडी मित्र मंडळ, वरवडे यांच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात ३६ दात्यांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र, गुलाब पुष्प, भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. मंडळाचे उपाध्यक्ष प्रशांत सावंत यांनी पुरस्कृत केलेल्या दर्जेदार बॅटऱ्या रक्तदात्यांना भेट देण्यात आल्या. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष विजय कडुलकर, उपाध्यक्ष प्रशांत सावंत, सचिव संदिप राणे, खजिनदार दर्शन पोयेकर आणि सहसचिव तेजस पोयेकर, धनंजय सावंत, शरद लाड, नरेंद्र कांबळी, स्वप्निल सावंत, तुषार बुचडे, रविराज कांबळी, प्रभाकर बुचडे, सुभाष सावंत, अक्षय पोयेकर,‌दिपक पोयेकर यांच्यासह ओरोस रक्तपेढीचे डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!