कुडाळ तालुका पत्रकार समिती अध्यक्षपदी आनंद मर्गज
उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार आणि कार्यकारिणी निवड
निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार आनंद मर्गज यांची २०२४-२६ या कालावधीसाठी निवड झाली आहे. आज झालेल्या निवडणूक प्रक्रियेत कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या नवीन कार्यकारिणीची निवड निवडणूक निरीक्षक बंटी केनवडेकर आणि संतोष राऊळ यांनी जाहीर केली. सचिवपदी काशीराम गायकवाड यांची तर उपाध्यक्ष म्हणून वैशाली खानोलकर आणि भूषण देसाई यांची. तसंच सहसचिव पदी प्रसाद राणे यांची तर खजिनदार म्हणून विठ्ठल राणे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
कुडाळ तालुका पत्रकार समितीची निवडणूक प्रक्रिया आज कुडाळ एमआयडीसी विश्रामगृहावर पार पडली. या निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने निरीक्षक म्हणून उपाध्यक्ष बंटी केनवडेकर आणि संतोष राऊळ उपस्थित होते. सुरुवातीला अध्यक्षपदाची निवडणूक झाली. अध्यक्षपदासाठी आनंद मर्गज आणि भरत केसरकर यांच्यात निवडणूक होऊन आनंद मर्गज हे विजयी झाल्याच निरीक्षकांनी जाहीर केलं.
दोन उपाध्यक्षपदासाठी सुद्धा बाबाजी उर्फ बाळा राणे, वैशाली खानोलकर आणि भूषण देसाई असे तीन उमेदवार रिंगणात होते. मत मोजणीनंतर वैशाली खानोलकर आणि भूषण देसाई यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याच निरीक्षक संतोष राऊळ आणि बंटी केनवडेकर यांनी जाहीर केलं. सचिवपदी काशीराम गायकवाड, सहसचिव म्हणून प्रसाद राणे आणि खजिनदार म्हणून विठ्ठल राणे यांची बिनविरोध म्हणून निवड झाली.
कार्यकारणीत पत्रकार गुरु दळवी, नाना बोगार,अरुण अणावकर, पद्माकर वालावलकर आणि राजाराम परब याची बिनविरोध निवड झाली. यावेळी नूतन कार्यकारिणीच अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, राजन नाईक, मावळते अध्यक्ष विजय पालकर, मावळते उपाध्यक्ष रवी गावडे, मावळते सचिव विलास कुडाळकर, मावळते खजिनदार अजय सावंत तसंच ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत सामंत, प्रमोद ठाकूर, निशा रांगणेकर, प्रशांत पोईपकर, प्रमोद म्हाडगूत, रजनीकांत कदम, निलेश उर्फ बंड्या जोशी, अभय परूळेकर, बाळू राऊळ, भगवान निवतकर, अजित परब, सुभाष मोरजकर, भाग्यविधाता वारंग, शंकर कोराणे, चंदू शेडगे, दिपक तारी, निशा रांगणेकर, हरिश्चंद्र पालव आदी पत्रकार उपस्थित होते. यावेळी रोहन नाईक व संजय तेंडोलकर उपस्थित होते.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.