वायंगणी सडयेवाडी ग्रामस्थ रंगले निसर्गाच्या सानिध्यात

कसाल येथील विद्यानिकेतन शाळेच्या मुलांनी घेतला गावपळणीचा आनंद

वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज. हवन होते नाम घेता फुकाचे श्लोक म्हणत कसाल येथील विद्यानिकेतन काॅन्हव्हेंन्स स्कूल आणि युरेका सायन्स च्या मुलांनी वायंगणी गावच्या देवपळणीचा आनंद घेत कालावल खाडी पात्रालगत उभारलेल्या सडयेवाडी ग्रामस्थांच्या झोपडीत जेवणाचाही आनंद घेतला.यावेळी ग्रामस्थांकडून देवपळणीबाबत चौकसपणे माहिती घेत निसर्गाच्या सानिध्यात आनंदही घेतला.याबाबत युरेका सायन्स क्लबच्या सुषमा केनी सांगता या भागातील गावपळण देवपळणीबाबत आम्ही जाणून होतो.आज ती अनुभवण्याचा योग आला. देवपळण दर तीन वर्षांनीच का होते,त्यामागचा उद्देश काय,अशा वेळी गावातील वातावरण कसं असतं ,लोक एकत्र एकोप्याने कसे राहतात तो अनुभव ,या परंपरा पुढच्या पीढिने पाळाव्यात या बाबत मुलांना माहिती देण्याच्या उद्देशाने या दवपळणीला आम्ही मुलांसह भेेट दिली. यावेळी वायंगणी माजी सरपंच संजना रेडकर त्यांच्या सोबत होत्या.
वायंगणी गावची गावपळण सोमवार पासून सुरु झाली आहे. लाईट नाही टिव्ही नाही यामुळे विरंगूळा आणि करमणुकीसाठी गावाच्या वेशीबाहेर झोपड्या उभारुन राहिलेल्या सडयेवाडी ग्रामस्थांनी गप्पा आणि पारंपारीक खेळात रमत गावपळणीची पहिली रात्र घालविली. तर देव विसावलेल्या चिंदर सडेवाडी ये थील भागात भजनाचा जागर करत मुलांच्या विविध गुणदर्शनपर कार्यक्रमांनी या भागातील ग्रामस्थांनी आपला वेळ घालविला.

वायंगणी गावच्या देवपळणीनिमित्त सडयेवाडीग्रामस्थ कालावल खाडीपात्रा लगत झोपड्या उभारुन निसर्गाच्या सानिध्यात राहत आहेत.या भागात चाकरमानी ही मोठ्या संख्येने हजर झाले आहेत. येथे ना लाईट ना टिव्ही,मोबाईल चार्जिंगची समस्या त्यामुळे सध्याच्या युगातील करमणुकीची साधना येथील ग्रामस्थांना उपलब्द नाहित यामुळे गप्पा मारणे, लगतच्या खाडीत मासेमारी करणे आदी करमणूकीत वेळ घालवत आहेत. या बाबत चाकरमानी सतीश सावंत सांगतात माझा जन्म देवपळणीतलाच माझे वय 68 वर्षाचे यामुळे लहान पणा पासूनच प्रत्येक वेळी या देवपळणीचा आनंद घेण्यासाठी मुंबई वरुन येतो. रानात झोपडी बांधून आम्ही सर्व राहत आहोत. प्रकाशासाठी
मेणबत्ती, चार्जिंग बल्ब वापरतो पण कुठल्या जनावरांची कि कसलिच भिती नाही. सर्व जण एकत्र येऊन धमाल मस्ती करतो. संध्याकाळी क्रिकेट, लहान मुलांची कबड्डी, भेंड्या लावणे अशात रमत मज्जा करतो.

error: Content is protected !!