सिंधुदुर्ग गणित अध्यापक मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या सन 2025_26 प्राविण्य परीक्षेत शेठ न.म. विद्यालय खारेपाटण या प्रशालेचा विद्यार्थी रेवण राऊळ याचे उज्वल यश

सिंधुदुर्ग गणित अध्यापक मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सन 2025-26 च्या प्राविण्य परीक्षेत शेठ न. म. विद्यालय, खारेपाटण या प्रशालेचा इयत्ता आठवीतील विद्यार्थी कुमार रेवण अनंत राऊळ याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवत प्रशालेचे तसेच खारेपाटण परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे. रेवण च्या या यशामागे त्याची सातत्यपूर्ण मेहनत, अभ्यासातील चिकाटी आणि प्रशालेतील सहाय्यक शिक्षिका सौ.भोर मॅडम व सो अमृते मॅडम यांचे मार्गदर्शन लाभदायक ठरले.
रेवण रेवणच्या या उज्वल यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष श्री. भाऊ राणे, सचिव श्री. महेश कोळसुलकर सर्व विश्वस्त व प्रशालेचे प्राचार्य श्री. संजय सानप, पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत सर्व शिक्षकवृंद तसेच पालकांनी रेवण चे अभिनंदन करून त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.

error: Content is protected !!