कुडाळमध्ये 30 जानेवारीला अजित पवार यांची सर्वपक्षीय श्रद्धांजली शोकसभा

महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री राज्यातील जनतेच्या हृदयातील दादा, स्पष्ट व तडकाफडकी निर्णय घेण्यात वाकबगार असलेले महाराष्ट्राचे एक वजनदार व प्रशासनावर भक्कम पकड असलेले अजातशत्रू अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी अकाली निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पक्षीयांच्या वतीने शुक्रवार दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मराठा समाज हॉल कुडाळ येथे शोक सभा आयोजित केली आहे, दिवंगत अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्व पक्षीय पदाधिकारी,व कार्यकर्त्यांनी या नियोजित वेळेत उपस्थित राहून सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले आहे.





