श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाटच्या विद्यार्थिनीनी रजत व कांस्य पदकाच्या मानकरी.

कुमारी दर्शना दत्ताराम इंदुलकर व कुमारी लतिका दीपक सावंत
गांधी रिसर्च फाउंडेशन,जळगाव’ मार्फत आयोजित गांधी संस्कार परीक्षेत प्रशालेतील दोन विद्यार्थिनींनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात द्वितीय व तृतीय येण्याचा मान पटकावत घवघवीत यश संपादन केले.
कुमारी दर्शना दत्ताराम इंदुलकर इयत्ता -10 वी हिने जिल्ह्यात द्वितीय येण्याचा मान पटकावला. तर कुमारी लतिका दीपक सावंत इयत्ता 10 वी हिने जिल्ह्यात तृतीय येण्याचा मान मिळवला.
या दोन्ही विद्यार्थिनींना रजत व कांस्य पदक देऊन गौरविण्यात आले. या परीक्षेत प्रशालेतील एकूण 46 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे प्रशालेस गांधी विचार फाउंडेशन जळगाव कडून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
परीक्षेत उत्तम यश संपादन केल्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक प्रसाद कुबल यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. या परीक्षेसाठी प्रशालेतील शिक्षिका प्रतिभा केळूसकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.





