कणकवली शहरातील उद्यानांमध्ये प्रेमीयुगुलांचा असलेला वावर रोखा!

नगरसेविका मेघा गांगण यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

कणकवली शहरातील सर्व उद्यानांमध्ये सीसीटीव्ही बसवणार

मुख्याधिकाऱ्यांचे मेघा गांगण यांना आश्वासन

कणकवली शहरातील सर्व उद्यानांची तातडीने दुरुस्ती करत सुशोभीकरण करा. तसेच या उद्यानांमध्ये नवीन झाडे लावा. अनेक उद्यानांमध्ये दररोज सकाळी 7 वाजल्यापासून प्रेमी युगुलांची असलेली गर्दी बंद करा. अशी मागणी कणकवली नगरपंचायत च्या विरोधी नगरसेविका मेघा गांगण यांनी मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्याकडे केली. त्यानंतर त्याची तातडीने दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी येथील गार्डनमध्ये भेट दिली. व शहरातील गार्डनमध्ये सीसीटीव्ही लावल्या बाबत आदेश दिले. अशी माहिती मेघा गांगण यांनी दिली. मेघा गांगण यांनी याबाबत मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधल्यानंतर त्या ताबडतोब टेबंवाडीच्या उद्यानाकडे दाखल झाल्या. तिथे होत असलेले अनैतिक प्रकार तिथल्या रहिवासीनी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी त्यातले गांभीर्य ओळखून ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिले. शहरातील सर्वच गार्डन मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षिततेची खबरदारी घेऊया असे सांगितले. शहरातील उद्यानांमध्ये सामाजिक संस्थाना सोबत घेऊन विविध उपक्रम राबवावेत असे नगरसेविका मेघा गांगण यांनी सांगितले.

error: Content is protected !!