कोकणाबद्दल शाळांसाठी वेगळे निकष असावेत अशी मागणी मुख्यमंत्री, शिक्षण मंत्र्यांकडे करणार

पालकमंत्री नितेश राणे यांचे शाळा वाचवा शिक्षण वाचवा आंदोलनकर्त्यांना आश्वासन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी पालक शिक्षक या आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी सकारात्मक भूमिका मांडली. जिल्ह्यातील मुलं हे आपलं भविष्य असून त्यांच्या शिक्षणावर अन्याय होऊ देणार नाही, असा विश्वास दिला. हा प्रश्न तुम्ही विरुद्ध आम्ही असा नसून कोकणासाठी निकष वेगळे असावेत यासाठी आमचे मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री त्यांच्याशी चर्चा करून व हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. सोमवारी जिल्हाधिकारी भवन शाळा बचाव आंदोलनाच्या ठिकाणी सामोरे जात सर्वांना मार्गदर्शन केले.
कोकणातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने वेगळे निकष लावावेत, अशी मागणी यापूर्वीही करण्यात आली आहे. संबंधित जीआरबाबत मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करून तातडीची बैठक घेऊ.
मंत्रालय स्तरावर तोडगा काढून विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. कृतीतून निर्णय दिसेल, केवळ शब्दांपुरते आश्वासन देणार नाही, असा विश्वास दिला. याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासहित माजी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत व अन्य उपस्थित होते.

error: Content is protected !!