शिवसेना कणकवली उपतालुकाप्रमुख पदी संजय नकाशे

कणकवली शिवसेना पक्षाच्या उप तालुकाप्रमुख पदी संजय नकाशे याची निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कुडाळ-मालवणचे आम.डाॅ. निलेश राणे याच्या आदेशाने जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यानी नियुक्तीपत्र देत केली आहे.यापूर्वी संजय नकाशे याची वाहतूक सेनेची जबाबदारी देण्यात आली होती.येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर त्याची निवड उपतालुकाप्रमुख म्हणून करण्यात आली असून पक्षाला अपेक्षित काम करून कणकवली तालुक्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी जोमाने काम करणार असल्याचे त्यानी निवडीअंती सांगितले

error: Content is protected !!