कणकवली शहरात काही भागांमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद

मुख्य जलवाहिनी लिकेज असल्याने होणार दुरुस्ती

कणकवली शहरामध्ये बांदकरवाडी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा मुख्य जलवाहिनी लिकेज असल्याने काही ठिकाणी बंद राहणार आहे. यामध्ये 3 जानेवारी रोजी कणकवली शहरातील निम्मेवाडी,भालचंद्रनगर, मधलीवाडी ,कांबळे गल्ली, सुतारवाडी, टेंबवाडी, फौजदार वाडी, डेगवेकर पोहे मिल, शाळा नं. 2, पिळणकरवाडी चा परिसर पाणी बंद ठेवण्यात येणार आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी व नगरपंचायतीला सहकार्य करावे असे आवाहन कणकवली नगरपंचायत मार्फत करण्यात आले आहे.

error: Content is protected !!