नायब तहसीलदार प्रदीप पवार यांना मातृशोक

सुनंदा लक्ष्मण पवार यांचे निधन
29 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता कुडाळ येथे अंत्यसंस्कार
जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेतील नायब तहसीलदार प्रदीप पवार यांच्या आई सुनंदा लक्ष्मण पवार (वय 83, मूळ रा. पुरळ, ता. देवगड, सध्या रा. कुडाळ) यांचे वृद्धापकाळाने कुडाळ येथील राहत्या घरी रविवार 28 डिसेंबर रोजी दुःखद निधन झाले. कै. सुनंदा यांच्या पच्चत दोन मुलगे, विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवार दिनांक 29 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता कुडाळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.





