निवडून आल्यानंतर नगरसेवक सुशांत नाईक यांचा कनकनगर प्रभागात कामाचा धडाका

कनकनगर येथील गटारा वरती लोखंडी प्लेट टाकून रस्ता केला सुव्यवस्थीत
कणकवली – शहरातील कनकनगर वॉर्ड मधील रस्त्याच्या मधोमध पाणी जाण्यासाठी गटार असल्याकारणाने, वाहन चालकांना येथून येजा करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता. कणकनगर प्रभागाचे नगरसेवक सुशांत नाईक यांनी ही बाब लक्षात घेऊन नगरसेवकपदी निवडून आल्यानंतर तातडीने जनसेवेचे काम हाती घेतले व स्वखर्चाने या गटारावरती लोखंडी प्लेट टाकून कणकनगर प्रभागात जाणारा तो रस्ता वाहतुकीस सुव्यवस्थित करून दिला. नगरसेवक सुशांत नाईक यांनी केलेल्या या कामाची कणकनगर वासियांमधून आभार व्यक्त केले जात आहेत.
यावेळी नगरसेवक सुशांत नाईक, बाबू जाधव, प्रसाद चव्हाण, गुरु मोर्ये, संदेश जाधव, रवी भंडारे आदी उपस्थित होते.





