मुळदे येथील जगन्नाथ चव्हाण यांचे निधन

कुडाळ तालुक्यातील मुळदे चव्हाणवाडी येथील सेवानिवृत्त आरोग्य सेवक (मलेरीया) व सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ सखाराम चव्हाण (वय ८१) यांचे अल्पशः आजाराने निधन झाले. आपल्या सेवाकार्यात त्यांनी अनेकांच्या घरी जाऊन आरोग्यसेवा दिली होती. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुळदे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य गुरुदास चव्हाण (पेंटर), रेल्वे कर्मचारी मनोहर चव्हाण, कुडाळ तलाठी विभागातील कोतवाल बाबू चव्हाण, मालवण तहसीलदार कर्मचारी दिलीप चव्हाण यांचे ते वडील होत त्यांच्या मागे पत्नी मुलगे सुना नातवंडे असा परिवार आहे.





