मनोज राणे यांची शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा सह संपर्कप्रमुख पदी नियुक्ती

सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने त्यांचे करण्यात आले स्वागत
ओझरम गावचे सुपुत्र तसेच मीरा-भाईंदर येथील संपर्कप्रमुख मनोज प्रताप राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा सह संपर्कप्रमुख पदी नेमणूक करण्यात आली. पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही नियुक्ती केली. त्या नंतर त्यांनी आज शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती संपर्क कार्यालय कणकवली येथे भेट दिली. त्यावेळी उपस्थित मान्यवरांमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला.
विधानसभा प्रमुख संदेश पटेल, तालुकाप्रमुख दामू सावंत, युवा सेना तालुकाप्रमुख निलेश तेली, कळसुली विभाग प्रमुख दिलीप घाडीगावकर आणि चिन्मय राणे उपस्थित होते.





