माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यासाठी शिरगाव येथे माजी सभापती रवींद्र जोगल यांचे उपोषण

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली भेट
देवगड – शिरगाव पंचक्रोशी (ता. देवगड) शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई, संचलित शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरगाव या प्रशालेत माजी विद्यार्थी व विदयार्थिनी संघ स्थापन करण्याच्या मागणीसाठी माजी सभापती रवींद्र जोगल हे शुक्रवार २६ डिसेंबर रोजी शाळेच्या गेट समोर उपोषणाला बसले होते. या उपोषणाला युवा सेना जिल्हाप्रमुख श्री सुशांत नाईक यांनी भेट देत उपोषणाला पाठिंबा दिला. स्थानिक संस्था पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मुंबई मंडळाशी बोलून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन यावेळी स्थानिक संस्थापदाधिकारी यांनी नाईक यांना दिले.
जोगल म्हणाले, आपल्या शाळेमध्ये माजी विद्यार्थी व विदयार्थिनी संघ स्थापन करण्यासाठी शासन परिपत्रक 2 ऑक्टोंबर 2025 रोजी आले होते. ते परिपत्रक मी शिरगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक यांना दिले व वारंवार तोंडी सांगून व लेखी पत्र देऊनही अद्याप पर्यंत कार्यवाही झालेली नाही म्हणून नाईलाज म्हणून मी उपोषणाचा निर्णय घेतला जोपर्यंत ठोस निर्णय मला मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे जोगल यांनी यावेळी सांगितले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, दादा सावंत, अमित साळगावकर, मयुर सावंत, मंगेश फाटक, गौरव सावंत, अशोक जाधव, सुधीर जाधव, विक्रांत नाईक, अभिषेक कदम, सुरेश जाधव, संदीप जाधव, सचिन पवार, अशोक चौकेकर, उत्तम तावडे, प्रथमेश तावडे, आदी उपस्थित होते.





