कुडाळ न. पं. विषय समिती सभापती निवड ३० डिसेंबरला

महिला व बालकल्याण समिती उपसभापती पदाचीही निवड होणार
कुडाळ नगरपंचायतीच्या विषय समिती सभापती पदासाठीची निवड आणि महिला व बालकल्याण समिती उपसभापती पदाची निवड यासाठी मंगळवार दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता नगरपंचायतीमध्ये विशेष सभा बोलवण्यात आली आहे. विजय समिती सभापती निवडीनंतर स्थायी समिती सुद्धा गठीत केली जाणार आहे.
दि. १० डिसेंबर रोजी विषय समिती सभापतीपदाची मुदत संपल्यामुळे ही निवड करण्यात येत आहे. यासाठी दु. १२ ते २० वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करायचे आहे. त्यानंतर दुपारी दोन वाजता निवडीसाठी विशेष सभा होणार आहे. सध्याचे कुडाळ नगरपंचायतीमधील पक्षीय बलाबल पाहता विषय समिती सभापतीच्या निवडी बिनविरोध होणार की निवडणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





