आयएएस ऑफिसर दत्तप्रसाद शिरसाट यांचे २९ ला स्पर्धा परीक्षांवर व्याख्यान

‘चला कुडाळ घडवूया’ अंतर्गत मंदार शिरसाट यांचा उपक्रम
भविष्यात नामवंत मार्गदर्शक सुद्धा करणार मार्गदर्शन
नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या माध्यमातून ”मार्गदर्शन भविष्यासाठी, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी… चला कुडाळ घडवूया”, या उपक्रमांतर्गत कुडाळचे सुपुत्र आयएएस ऑफिसर दत्तप्रसाद शिरसाट यांच्या यूपीएससी स्पर्धा परीक्षा याविषयी मार्गदर्शनपर मोफत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत मराठा समाज सभागृह येथे हे व्याख्यान होणार आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांनी या व्याख्यानाला उपस्थित राहावे असे आवाहन मंदार शिरसाट यांनी केले आहे.
नगरसेवक मंदार शिरसाट यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. यावेळी संदीप म्हाडेश्वर आणि अमित राणे उपस्थित होते. श्री. शिरसाट म्हणाले, कुडाळ शहर हे आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक तसेच विचाराचे शहर म्हणून ओळखले जाते. आरती प्रभू, बाबा वर्दम, एकनाथ ठाकूर अशा अनेक विचारवंतांचा वारसा या शहराला लाभलेला आहे. असे असूनसुद्धा गेल्या दहा वर्षात कुडाळ शहरातून आयएएस किंवा यूपीएससी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले फार कमी विद्यार्थी पाहायला मिळतात. त्याच अनुशंघाने आजच्या पिढीला विचारवंतांचे मार्गदर्शन मिळावे असा संकल्प करण्यात आला आहे. यासाठी ”मार्गदर्शन भविष्यासाठी, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी… चला कुडाळ घडवूया”, या उपक्रमांतर्गत कुडाळचे सुपुत्र आयएएस ऑफिसर दत्तप्रसाद सूर्यकांत शिरसाट यांच्या यूपीएससी स्पर्धा परीक्षा याविषयी मार्गदर्शनपर मोफत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. दत्तप्रसाद शिरसाट यान या क्षेत्रातील प्रचंड अनुभव आहे. १७ विविध ऑडिट ट्रेनिंग त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत. जवळपास आठ ते दहा देशामध्ये त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. २०१६ मध्ये इंडो-चायना युथ ऑडिटर कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. एएमजी-ग्रेट तो सिलेक्टर याच्या संचालक मंडळावर ते आहेत. कुडाळ शंकर किंवा तालुक्यातील जी मुले स्पर्धा परीक्षांना बसू इच्छितात त्यांच्याशी ते संवाद साधणार आहेत. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांनी या व्याख्यानाला उपस्थित राहावे असे आवाहन मंदार शिरसाट यांनी केले आहे.
श्री. शिरसाट पुढे म्हणाले, हे व्याख्यान पूर्णपणे मोफत आहे. हे आमचे पहिले पर्व आहे. यापुढे असे अनेक विचारवंत आणून त्यांची मार्गदर्शनपर व्याख्याने ठेवली जाणार आहेत. यामध्ये जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात खगोलशास्त्र तज्ञाशी संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न असणार आहे. ज्यामुळे नासा किंवा इस्रो मध्ये जाण्यासाठी कोणता प्लॅटफॉर्म असतो, कोणत्या परीक्षा असतात याचे मार्गदर्शन यावेळी केले जाईल. त्याच बॉंबर काही आयएएस ऑफिसरांच्या आम्ही संपर्कात असून त्यांनी येथील मुलांना मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शविली असल्याचे श्री. शिरसाट यांनी सांगितले.
तसेच मुलांसाठी मेडिकल, इंजिनिअरिंग, वकिली यासाठीच्या मॉक टेस्ट बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर घेतल्या जाणार असल्याचेही श्री. शिरसाट यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्यातील मुलांचा दहावी-बारावीचा निकाल राज्यात चांगला लागून सुद्धा आपली मूळ स्पर्धा परीक्षांत मागे का पडतात, हा अंतर्मुख करणारा प्रश्न आहे. त्यावर अशा मार्गदशनातून नक्की मार्ग निघेल अशी अशा श्री. शिरसाट यांनी व्यक्त केली. यापुढे सुद्धा मुले आणि पालक यांच्याकडून आलेल्या सूचनांचा विचार करून नामवंत तज्ज्ञ आणले जातील मुलांना ज्या क्षेत्रात जायचे आहे, त्या क्षेत्रातील तज्ञ कोण आहेत त्या तज्ज्ञांना येथे आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू अशी ग्वाही श्री. शिरसाट यांनी यावेळी दिली. कुडाळ शहरातील मुलांची एक चांगली पिढी घडविण्यासाठी प्रयत्न आपण सारे मिळूनच करूया असे आवाहन त्यांनी शेवटी केले. अधिक माहितीसाठी मंदार शिरसाट (मोबाईल क्र ९४०५८१२१२१ / ९९२३७४२१२१) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री. शिरसाट यांनी केले आहे.





