असलदे येथे श्री देवी माऊली मंदिराचा जिर्णोध्दार वर्धापन दिन व सत्यनारायणाची महापूजा कार्यक्रम

२६ डिसेंबरला चेंदवण दशावतार नाट्यमंडळाचा सुर्यग्रहण दशावतारी नाट्यप्रयोग होणार
असलदे येथे श्री देवी माऊली मंदिराचा जिर्णोध्दार वर्धापन दिन व सत्यनारायणाची महापूजा कार्यक्रम दि. २५ व २६ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ डिसेंबरला चेंदवण दशावतार नाट्यमंडळाचा सुर्यग्रहण दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
कार्यक्रम गुरुवार दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी सायं. ४.३० वा. सत्यनारायण महापुजा, रात्रौ १० वा. स्थानिक भजने होणार आहेत. शुक्रवार दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वा. श्री माऊली देवीचा अभिषेक, दुपारी १२.३० वा. महाआरती, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद, रात्रौ १०.३० वा. चेंदवण दशावतार नाट्यमंडळाचा सुर्यग्रहण दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तरी, या सर्व धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन असलदे मधलीवाडी ग्रामस्थ मंडळी यांच्यावतीने करण्यात आले आहे.





