नागवेकर हॉस्पिटल तोडफोड, डॉक्टर व नर्सिंग स्टाफ वर हल्ला प्रकरणी उद्या सिंधुदुर्गातील डॉक्टरांची वैद्यकीय सेवा बंद

जिल्हाधिकाऱ्यांना सदर घटनेबाबत देणार निवेदन
तातडीची वैद्यकीय सेवा सुरू ठेवणार
डॉक्टरांच्या संघटनेची माहिती
कासार्डे येथील कस्तुरी पाताडे या युवतीच्या मृत्यू नंतर वस्तुस्थिती समजून न घेता काही समाज विघातक वृत्तीनी कायदा हातात घेत कणकवली येथील डॉ नागवेकर हॉस्पिटल वर हल्ला केला. व हॉस्पिटल ची तोडफोड केली. तसेच नागवेकर कुटुंबियांतील महिला डॉक्टर्स वर व नर्सिंग स्टाफ वर हल्ला केला. त्याचा सिंधुदुर्ग मधील सर्व डॉक्टर्स संघटनानी तीव्र निषेध व संताप व्यक्त केला आहे. याबाबतची डॉक्टर फ्रेटर्निंटी क्लब ची आज सोमवारी कणकवलीमध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. व या घटनेचा निषेध म्हणून मंगळवार 16 डिसेंबर 2025 रोजी ज़िल्ह्यातील सर्व दवाखाने, हॉस्पिटल्स बंद ठेवण्यात येणार आहेत. फक्त तातडीच सेवा चालू राहील, अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. तसेच याबाबत उद्या जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असल्याचेही संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. याला सहकार्य करण्याचे आवाहन डॉक्टर्स फ्रेटर्निंटी क्लब, सिंधुदुर्ग, फ्रायडे क्लब, कणकवली, व इंडियन मेडिकल असोसिएशन, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
दिगंबर वालावलकर कणकवली





