खासदार राऊत, आमदार नाईक यांनी कोटींचा निधी दिल्यानेच नागरिक उध्दव ठाकरे शिवसेनेसोबत !

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांचे प्रतिपादन, तेंडोली, आंदुर्ले, पाट, माड्याची वाडी गावात शिवसैनिकांच्या गाठीभेटी
कुडाळ : प्रत्येक गावामध्ये विकासकामांसाठी निधी आणि सर्वसामान्य लोकांना केव्हाही उपलब्ध होणारे खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक हेच लोकप्रतिनिधी असल्याने शिवसैनिक गावागावात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनेच्या पाठीशी असल्यानेच या भागात कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, शिवसेनेचे अतुल बंगे, शिवसेना विभागप्रमुख संदेश प्रभू यांनी तेंडोली, आंदुर्ले, पाट, माड्याची वाडी या विभागात खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या आदेशानुसार गावातील कार्यकर्त्यांची बैठका घेण्यात आल्या. यावेळी शिवसैनिकांनी बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन गावागावातील लोक आमदार वैभव नाईक, खासदार विनायक यांच्या निष्ठेवर खुश असून येणारी विधानसभा आमदार वैभव नाईक प्रचंड ताकदीने जिंकतील असा विश्वास बैठकांमधून कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी संजय पडते यांनी मार्गदर्शन केले. पाटमध्ये विभागप्रमुख संदेश प्रभु, उपविभाग प्रमुख महेश वेळकर, वसंत कोनकर, तात्या वेंगुर्लेकर, अरूण तांडेल, संतोष घनःश्याम पाटील, माजी सरपंच पुजा विश्वजीत सर्वेकर, अजित सर्वेकर, उत्तम राऊळ, समीर पेडणेकर, विजय राणे, स्वप्नील श्रीधर राऊळ, आनंद रमाकांत परब, नाना परब, बबन पाटकर, गणेश माधव, बंडया माधव, दिया आवळे, वैष्णवी शेगले, सुनील हळदणकर, बाळा मांजरेकर, लवू परब, कांता परब, सहदेव प्रभू, जितेंद्र गोसावी, रवि मराळ, बाबा ठुम्बरे, बाळा माधव, रुपेश राऊत, प्रशांत पाटकर, मकरंद पाटकर, बाळा येरम, बाळकृष्ण खोत, कृष्णकमल येरम विठोबा शेगले, शशी बागवे, राजन कुंभार,सचिन कुंभार, माड्याची वाडी सरपंच सचिन गावडे, उपसरपंच योगेश्वरी कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य विघ्नेश गावडे, जेष्ठ शिवसैनिक सुभाष परब, जेष्ठ शिवसैनिक शरद परब, तेंडोली विभाग प्रमुख संदेश प्रभु, सरपंच अनघा तेंडोलकर, जेष्ठ शिवसैनिक अवि तेंडोंलकर, उपस्थित होते.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ

