अखेर 10 नंबर प्रभागामध्ये भाजपचं ठरलं!

आर्या औदुंबर राणे यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी
कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच लक्षवेधी ठरलेल्या प्रभाग क्रमांक 10 मधून अखेर भाजपा कडून आर्या औदुंबर राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या प्रभागामधून भाजपाकडून अजून काही जण इच्छुक होते. परंतु ऐनवेळी आर्या राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांना एबी फॉर्म देण्यात आल्याने या निवडणुकीत देखील हा प्रभाग लक्षवेधी ठरणार आहे.





