कुडाळ येथील दिवाणी न्यायालयात दिनांक १३ डिसेंबरला राष्टीय लोकअदालत

मुंबई उच्च न्यायालय महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरुन दिवाणी न्यायालय (क स्तर ) कुडाळ येथे शनिवार दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता राष्टीय लोकअदालत आयोजीत करणेत आले आहे- तालुका विधी सेवा समिती कुडाळ व तालुका बार असाेशिएशन यांचे संयुक्त विदयमाने हे राष्टीय लोअदालत होणार आहे
ज्या पक्षकारांचे दिवाणी न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व तडजाेडयुक्त फाैजदारीकडील खटले तडजोडीने मिटवायची असेल किंवा ज्या पक्षकारांना आपले प्रकरण चर्चेव्दारे मिटवायचे असेल अशा पक्षकारांनी चर्चेसाठी या न्यायालयात हजर राहावे किवा त्यानुसार उभय पक्षकारांना चर्चेची तारीख व माध्यम ठरविण्यात येईल तसेच सर्व राष्टीयक्रुत बॅंका,सरकारी बॅंका, स्वायत्त संस्था, ग्रामपंचायत,नगरपंचायत कडील वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवायची आहेत, त्यांनी आपली प्रकरणे तालुका विधी सेवा समिती कुडाळ या कार्यालयाकडे लवकरात लवकर दाखल करावीत. लोकन्यायालय यशस्वीतेसाठी सहकार्य करावे असे आवाहन दिवाणी न्यायाधीश (क स्तर ) कुडाळ तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष जी ए कुलकर्णी यांनी केले आहे.

error: Content is protected !!