सेवानिवृत्त ग्रामसेवक मनोहर लाड यांचे निधन

कणकवलीसह वैभववाडी, देवगड तालुक्यांमध्ये देखील केले होते ग्रामसेवक म्हणून काम
कणकवली तालुक्यातील कळसुली हुंबरणे येथील रहिवासी व सेवानिवृत्त ग्रामसेवक मनोहर विठ्ठल लाड (वय 77) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. कणकवली तालुक्यासह वैभववाडी व देवगड मध्ये देखील त्यांनी ग्रामसेवक म्हणून सेवा बजावली होती. कणकवली तालुक्यात करूळ, हुंबरट, साकेडी, शिवडाव या ठिकाणी त्यांनी ग्राम विकासाच्या कामांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या पश्चात 2 मुलगे, सुन, मुली, नातवंडे, असा परिवार आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक कामाची असलेली आवड जोपासली होती. यासोबत त्यांना भजनाची आवड देखील होती. उत्कृष्ट पखवाज आणि झांज वादक म्हणून देखील ते परिचित होते.





