न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा येथे ‘बालदिन’ उत्साहात साजरा!

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती बालदिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा येथे बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेमध्ये वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वेशभूषा स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक, सामाजिक, पौराणिक आणि कल्पित पात्रांची वेशभूषा करून आपली प्रतिभा सादर केली. स्पर्धेचे आयोजन दोन गटांमध्ये करण्यात आले होते, ज्याचा निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला:
गट क्रमांक १ (इयत्ता ५ वी व ६ वी) नव्या केदार शिर्के | अवधूत दत्तात्रय केळकर २. भक्ती सुरेंद्र सुर्वे , सृष्टी सुरेश माटवकर
२ आरोही मंदार मुळये
गट क्रमांक २ (इयत्ता ७ वी व ८ वी) १. एंजल स्टीफन फर्नांडीस | १. खुशी श्रीपाद सावंत ,
. गौरी रत्मकांत उदगिरे , समर्थ सुनिल थुमडे
स्वरा नित्यानंद तळवडकर यांना गौरविण्यात आले.
या यशस्वी कार्यक्रमाबद्दल संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित पालक यांच्यावतीने सर्व विजेत्या स्पर्धकांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.





